संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
दिनांक- 01/10/2021
कोविड -19 लस जागरूकता अभियान पत्रक नंबर - 3 प्रसिद्ध केले. तसेच गावामध्ये वर्तमान पेपर मधून वाटप करण्यात आले
दिनांक- 15/05/2021
पालकमंत्री ना. जयंतराव पाटील (साहेब) व जिल्हा परीषद सांगली माजी उपाध्यक्ष रणजीत पाटील (दादा) व यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते संग्राम जगदीश पाटील (आण्णा) यांच्या सहकार्यातून राजारामबापू पाटील विकास सेवा सोसायटी मार्फत मास्क व रोगप्रतिकारक शक्ती वर्धक गोळ्यांचे असे कीट तयार करुन संचालक व पदाधिकारी, स्वयंसेवक यांना प्रत्येकी 10-15 किट तयार करुन त्यांच्या मार्फत सभासदांना वाटप करण्यासाठी दिले.
दिनांक - 05/10/2020
कोविड-19 जागरूकता अभियान पत्रक नंबर - 2 प्रसिद्ध करताना संग्राम जगदीश पाटील (आण्णा) यावेळी सोबत संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
गावामध्ये वर्तमान पेपर मधून वाटप करण्यात आले
दिनांक - 21/09/2020
कोरोना या भयंकर महामारीच्या काळात आज सर्वसामान्य लोकांना ऑक्सिजन ची कमतरता भासत आहे, त्यात ऑक्सिजन अभावी लोकांचे प्राण जात आहेत. याचे गांभीर्य पाहुन मा.ना. जयंतराव पाटील (साहेब) व रणजित पाटील (दादा) मा. उपाध्यक्ष जिल्हा परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली संग्राम जगदीश पाटील (आण्णा) यांच्या सहकार्याने पोर्टेबल ऑक्सिजन ची सोय करण्यात आली आहे. तरी गरजुनी संपर्क साधावा.
रा.बा.पा. सोसायटी ,
कामेरी - 70589 53933
दिनांक - 22/08/2020
कोरोना विष्णूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला. या विषाणूंच्या प्रतिबंधासाठी वापरण्यात येणा-या हॅन्ड सॅनिटायझर, मास्क, औषधंला प्रचंड मागणी वाढल्याने बाजारात त्यांचा तुटवडा निर्माण झाला होता. तसेच काही ठिकाणी त्यांची चढ्या दराने विक्री केली जात असल्याने, सभासद, ठेवीदार, कर्मचारी, शासकीय, निम शासकीय संस्थेमधील कर्मचारी ना मिळणे दुरापास्त झाले होते. यावर तोडगा म्हणून सोसायटी सन – 2020 मध्ये सॅनिटायझर, मास्क,सभासद, ठेवीदार, कर्मचारी, शासकीय, निम शासकीय संस्थेमधील कर्मचारी यांना मोफत वाटप डॉ. प्रताप पाटील, रणजीत पाटील याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
दिनांक - 26/04/2020
कोविड-19 जागरूकता अभियान पत्रक नंबर - 1 प्रसिद्ध करताना भैरवदेव पतसंस्था संस्थापक सुनील पाटील (बापू) व सांगली जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजीत जगदीश पाटील (दादा) यावेळी सोबत ग्रामपचांयत व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. गावामध्ये वर्तमान पेपर मधून वाटप करण्यात आले.
दिनांक - 26/04/2020
राजारामबापू पाटील विकास सेवा सोसायटी व कामेरी येडेनिपाणी पाणीपुरवठा संस्था मार्फत कामेरी ग्रामपंचायत कर्मचारी, स्वयंमसेवक यांना औषध फवारणीसाठी डोळ्यांच्या संरक्षणासाठी Face Guard वाटप केले यावेळी सुनील पाटील (बापु ), रणजित पाटील (दादा), दि.बा.पाटील (आप्पा), संग्राम पाटील (आण्णा) तसेच ग्रामपंचायत व विकास संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Powered by & Copyright © 2021- 2022 RAJARAMBAPU PATIL CO Operative SERVICE SOCIETY - All Rights Reserved.
Developed by Patil & Mane team.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.