संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
ब-याचदा खातेदारांना योग्य पध्दतीने निरोप दिला आहे की नाही यांची माहिती संस्थेत समजत नसल्याने सोसायटीचा हंगाम सुरू झाल्यानंतर यंत्रणा राबविताना बरेच अडथळे निर्माण होतं असतात. काही वेळा बॅक, सोसायटी आणि खातेदार यांच्यात वादाचे प्रसंगही उद्भवत असतात. यावर तोडगा म्हणून संग्राम पाटील यांनी एस.एम.एस. व व्हाईस कॉल, सोशल मिडीया एफ वरून मोफत सुविधा प्रत्येक खातेदाराच्या मोबाईल वरती संस्थेची माहिती, नोटीस, निरोप, इत्यादी या बाबतची संपुर्ण माहीती नमूद करुन पाठवली जाते. सोसायटीने राबविलेल्या या पारदर्शक कारभारामुळे आता प्रत्येक खातेदारांला आपल्या मोबाईल वरती सविस्तर माहिती उपलब्ध होत आहे.
कामगार हा सोसायटी चा कणा असल्याने कामगार वर्गाच्या हितासाठी संग्राम पाटील नेहमी आग्रही राहिले आहेत. संस्थेचे कामकाज पाहताना पाटील यांनी वेळोवेळी कामगारांना पगारवाढ दिली. त्यानंतर दुस-या टप्प्यात यांनी दिवाळी बोनस वाढवून दिला. तर तिस-या टप्प्यात नवीन वर्षांमध्ये सर्व कामगारांना गिप्ठ बाॅक्स दिला. तसेच त्यांना अन्य लाभ मिळवून दिला आहे. कामगारांना दिलेल्या या प्रोत्साहनामुळे सोसायटीतील कामगारामध्ये समाधानाचे वातावरण आहे. या शिवाय कामगारांना कोविड - 19 बचाव सुरक्षा साधनाचे वाटप इत्यादी माध्यमातून कामगारांचे हित साधले जात आहे.
सहकारात सभासद हा सोसायटीचा मालक असल्याने सोसायटीत देण्यात येणा-या सेवा त्याचा नैतिक हक्क असून, त्याला सेवा मोफतच उपलब्ध झाली पाहीजे, असा दूरद्दष्टीचा विचार कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा) यांचा होता. सोसायटीतून मिळणारी मोफत सेवा मिळू लागल्याने सभासदामधूनही या निर्णयाचे स्वागत केले गेले.
सोसायटी ला दरवर्षी मोठ्या प्रमाणात विविध शासकीय व निम शासकीय संस्थेची दिनदर्शिका मिळतात. आलेले सर्व दिनदर्शिका सर्व खातेदारांना मोफत वाटप संस्थेमार्फत केले जातात.
Powered by & Copyright © 2021- 2022 RAJARAMBAPU PATIL CO Operative SERVICE SOCIETY - All Rights Reserved.
Developed by Patil & Mane team.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.