वार्षिक सर्व साधारण सभेची नोटीस
(फक्त सभासदांकरीता)
राजारामबापू पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी (संस्था) सोसायटी मर्यादित; कामेरी, ता. वाळवा, जि. सांगली. या संस्थेची संचालक मासिक सभा दिनांक – 01/09/2023 रोजी सकाळी 09:00 वाजता सोसायटीच्या कार्यालयात घेणेत आली त्यातील ठराव नंबर – 2 प्रमाणे सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक - 17/09/2023 रोजी सकाळी 10:00वाजता कामेरी येडेनिपाणी सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्यादित; कामेरी मधील कृषीभूषण जगदीश पाटील (आप्पा) सभागृहात मध्ये आपल्या सोसायटीचे मा. चेअरमन श्री. संग्राम जगदीश पाटील यांचे अध्यक्षतेखाली बोलविण्यात येणार आहे. तरी सभेस खालील प्रमाणे विषय होतील. तसेच सोसायटीच्या सर्व सभासदानी वार्षिक सर्वसाधारण सभेला वेळेत उपस्थित राहावे हि विनंती.
-: सभेपुढील विषय :-
- मागील वार्षिक सर्व साधारण दिनांक - 22/09/2022 रोजी चे प्रोसिडीग वाचून कायम करणे.
- दिनांक - 31/03/2023 अखेरची आर्थिक पत्रके वाचून मंजूरी घेणे.
- सन - 2022 - 2023 च्या अंदापेक्षा कमी - जास्त खर्चास मंजूरी मान्यता घेणे. सन - 2023 - 2024 च्या अंदाजपत्रकास मान्यता घेणे.
- सन - 2022 - 2023 च्या नफा विभागणी बाबत चर्चा करणे.
- सन - 2023 - 2024 सालाकरीता वैधानिक लेखापरीक्षक नेमणूक बाबत चर्चा करणे.
- दिनांक - 31/03/2023 च्या लेखापरीक्षण दोष दुरुस्तीस मान्यता घेणे. व मागील लगतच्या वर्षाचा लेखापरीक्षणाचा दोष दुरुस्ती अहवाल वाचून नोद घेणे बाबत.
- थकबाकी वसुली बाबत चर्चा करणे.
- आदर्श उपविधी मधील पोटनियम क्रमांक 4 व 5 मधील शब्दरचनेच्या ठिकाणी नव्याने शासनाने परीशिष्ट मध्ये नमूद केले नवीन शब्दरचनेचा समावेश केला आहे. त्याचे वाचन करून त्यावरती चर्चा करणे.
- गोडाऊन / ऑफिस इमारत बाधकाम बाबत चर्चा करणे.
- ई – पीक पाहणी मोबाईल अॅप व पीक नोंदणीची प्रक्रिया बद्दल माहिती देणे व प्रत्येक सभासदांनी आपल्या क्षेत्राची पिक पिक पाणी करणे आवश्यक आहे .
- मा. चेअरमन साहेब याचे परवानगीने सभेपुढे ऐनवेळी येणारे विषयावर चर्चा करणे.
- ठिकाण - कामेरी
- वार – शुक्रवार, दिनाक – 01/09/2023
(सही/-) (सही/-) (सही/-)
सचिव व्हा.चेअरमन चेअरमन
अनिल यशवंत धनवडे सुधीर आनंदा आढाव संग्राम जगदीश पाटील
(फक्त सभासदांकरीता)
विशेष सुचना :-
- सदरची सभा कोरमअभावी तहकूब झालेस त्याच ठिकाणी एक तासानंतर घेतली जाईल. त्याच ठिकाणी घेण्यात येईल त्यास कोरमची आवश्यकता असणार नाही.
- संस्थेच्या कामकाजाविषयी अडी – अडचणी बाबत काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी संस्थेकडे सभेच्या तारखेच्या आठ दिवस अगोदर सार्वजनिक सुट्टी सोडून संस्था वेळेत सोसायटी कार्यलयात अगर रजिस्टर पत्राने अगर प्रत्यक्षात लेखी स्वरुपात सुचना पोहोचतील अशा रीतीने द्यावीत. तोडी प्रश्न विचारत घेतले जाणार नाहीत.
- सन - 2022 – 2023 मधील आर्थिक पत्रक संस्था नोटीस बोर्ड वरती व गावतील विविध सार्वजिक ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
- सभेस येतांना शासकीय ओळखपत्र / आधार कार्ड ओरीजनल सोबत आणणे आवश्यक आहे.
- सभासदांनी पत्ते, मोबाईल नबर, बद्दलेले असतील तसेच शेती गट नंबर बद्दलेले किवा विक्री – खरेदी केली असेल तर त्यांनी सोसायटी कडे लेखी माहिती आठ दिवसाच्या आत द्यावी.
- ज्या सभासदांचे संस्थेची के. वाय. सी, कमाल मर्यादा रजिस्टर, जीदगी पत्रक रजिस्टर पूर्ण झाले नाहीत. त्यां सभासदांनी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावीत. अपूर्ण असणारी सभासदाची यादी संस्थेच्या नोटीस बोर्डावरती प्रसिध्द करण्यात आली आहे. आवश्यक कागद पत्रे – रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना किवा यशवतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना ऊस बिल कोड पावती सन – 2022 – 2023, तसेच कारखान्याचे सभासद असेल तर सभासद कार्ड कलर झेरॉक्स, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि; सांगली शाखा – कामेरी, ता. वाळवा जि. सांगली येथील सेव्हिग पासबुक, इत्यादी कागदपत्राची कलर झेरॉक्स 2 प्रतीत आवश्यक आहेत. तर सर्व खाते उतारा, सर्व 7/12 उतारा डीजिटल बारकोड उतारे / तलाठी सहीने आवश्यक, आयडीटी साईज फोटो 2 नग, 7/12 उतारा वरील असणारे आवश्यक असल्यास इतर बोजा असणारी संस्थेची दाखले, फेरफार पाहिजेत. तर मोबाईल फोन नबर आवश्यक आहे.
- क्रियाशील सभासद म्हणजे संस्थेचा असा सभासद जो संस्थेच्या सलग पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सर्व सभासदाच्या आधिमंडळच्या किमान एका सभेला उपस्थित आहे. सलग पाच वर्षाच्या कालावधीमध्ये किमान एक वेळा अल्प मुदत कर्ज, (रोख रक्कमेच्या स्वरूपात अथवा अन्यप्रकारे) अथवा मध्यम मुदत कर्ज, घेतले अथवा दीर्घ मुदत कर्ज घेतले असले पाहिजे. वरील बाबीची पूर्तता करीत नसाल तर त्या सभासदांचे वर्गीकरण अक्रियाशील सभासद म्हणून करण्यात येईल.
- मयत सभासदच्या नातेवाईकांनी संस्थेत अर्ज करून वारस नोंद करून घ्यावी. अर्जासोबत मयत दाखला, वारस दाखला, वारस फेरफार इतर वारसांची 100 रुपये मुद्रांक पेपर वरती रजिस्टर संमतीपत्र आवश्यक आहे. ज्या मयत सभासदाचे वारस रेकॉर्डवर आणले नाहीत. किवा दिले नाही तर अशा सभासदांची शेअर्सची रक्कम हि वार्षिक सभेच्या मंजुरीने तीन महिन्याच्या मुदतीत नेली नाही तर ती रक्कम राखीव निधीस वर्ग केली जाईल. यांची नोंद घ्यावी.
- शेअर्स रक्कम हि सभासदाची ठेव नाही.
- सभासदांनी कृपा करून स्वत:चे नावे कर्ज काढून दुस-यास देऊ नये.
- सभासदांनी कर्जदाराची खात्री असल्याशिवाय जमीन होऊ नये. कर्ज थकीत झालेस कर्जाची रक्कम जामीनदाराकडून वसूल होते हे लक्षात ठेवावे.