संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
‘ग्रामीण भागामध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जात असल्याने या सोसायट्या शेतकऱ्यांचा मुख्य आधार असतो. या सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्जही देण्यात येते. पीक कर्जाबरोबरच खते, बियाणे, शेतीची अवजारे यासाठीही सोसायट्या कर्जपुरवठा करतात. शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यात विविध कार्यकारी सोसायटीचे मोलाचे योगदान आहे.
राज्य बँक, जिल्हा बँक आणि गावोगावच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या,अशी ञिस्तरीय वित्त पुरवठा व्यवस्था निर्माण करण्यात आली. शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करणे हे या ञिस्तरीय यंञणेचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानुसार गावोगावीसोसायट्यांची स्थापना होत गेली. सोसायट्यांना जिल्हा बँक कर्ज देते. त्यातून सोसायट्या शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतात. शेतकऱ्यांकडून होणाऱ्या वसुलातून जिल्हा बँकेचे कर्ज फेडून उरलेल्यानफ्यातून सोसायट्यांचा कारभार केला जातो.
Powered by & Copyright © 2021- 2022 RAJARAMBAPU PATIL CO Operative SERVICE SOCIETY - All Rights Reserved.
Developed by Patil & Mane team.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.